Kothimbir Vadya Recipe In Marathi

Kothimbir Vadya Recipe In Marathi

 

Aapli Recipe
Kothimbir Vadya Recipe In Marathi


▪️साहित्य- कोथिंबीर वड्यासाठी लागणारे साहित्य :

• ३ जुड्या कोथिंबीर निवडून चिरलेली
• १ चणा पिठ
• १ कप पाणी
• १ टेस्पून तांदूळ पिठ
• ७-८ लसूण पाकळ्या
• १ छोटा आल्याचा तुकडा, किसून
• ६-७ हिरव्या मिरच्या
• १ टिस्पून हळद
• १ टिस्पून जिरे
• २ टेस्पून तेल
• चवीपुरते मिठ
• तीळ २ टीस्पून

Momos Recipe In Marathi

▪️कृती-कोथींबीर वड्या कश्याप्रकारे बनवायच्या?

१) सर्वप्रथम कोथिंबीर चाळणीमध्ये स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी व स्वच्छ धुतलेली कोथिंबीर एका परातीमध्ये घ्या.
२) त्यानंतर मग त्याच मध्ये बेसन पीठ तांदळाचे पीठ सफेद तीळ मिरचीची पेस्ट हळद चिरलेल्या लसूण पाकळ्या स्वादानुसार मीठ आणि तीळ सर्व मिश्रण एकजीव करा.
३) करून घेतल्यानंतर घट्ट मळून घ्या मिश्रण तयार झाल्यानंतर त्याची रोल तयार करा.
४) रोल तयार करून झाल्यानंतर ती एका घरच्या भांड्यात १० १६ मिनिट राहू द्या.
५) दहा ते पंधरा मिनिटे झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावर झाकण उघडून वडीचे रोल बाहेर काढावेत.
६) सुमारे पाच मिनिट वडीचा रोल पोळपाटावर घेऊन सुरीने वड्या पाडून घ्या.
७) नंतर गॅस वरती कढई ठेवा वड्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल टाका गरम होण्यासाठी ठेवा.
८) वड्या कट करून झाल्यानंतर गरम तेलामध्ये त्या तळाव्यात.
९) त्यानंतर त्या एका टिशू पेपर मध्ये काढून घ्यावे म्हणजे जास्त तेलकट होणार नाही.
१०) नंतर एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घ्या आणि त्या भाकरी किंवा चपात्या सोबत तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता किंवा टोमॅटो सॉस सोबत ही खाऊ शकता.

Koshimbir Recipe In Marathi

Makhana Recipe In Marathi

Leave a comment