Site icon Aapli Recipe

Tomato Chatani Recipe In Marathi

Tomato Chatani Recipe In Marathi

आज आपण टोमॅटोची चटणी कशी बनवायची हे बघणार आहे पण त्याआधी आपण टोमॅटो खाण्याचे फायदे बघुया. टोमॅटोमुळे शरीरातील टायमिंग मी यासीन बी जीवनसत्वे मॅग्नेशियम आपल्याला त्यापासून भेटतात. हाडे मजबूत करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सर्वात जास्त फायदा म्हणजे टोमॅटो खाल्ल्याने आपलं रक्त वाढतं. टोमॅटो रोज खाल्ल्याने अन्नाची चव सुधारण्याबरोबरच आरोग्यालाही चांगला फायदा मिळू शकतो. आज आपण बघू टोमॅटोची चटणी कशी बनवायची तर चला जाणून घेऊया आज.

Tomato Chatani Recipe In Marathi
▪️टोमॅटो चटणीसाठी लागणारे साहित्य | Ingradients For Tomato Chatani :

• टोमॅटो- ४
• कढीपत्ता ४-५ पान
• मोहरी -१ टीस्पून
• जिरे -१ टीस्पून
• धने पावडर -१ टीस्पून
• गरम मसाला -१ टीस्पून
• प्रवीण मसाला -१ टीस्पून
• मिरची पावडर -१ टीस्पून
• मीठ – चवीनुसार
• तेल – आवश्यकतेनुसार
• कांदा- ३
• लसूण -५-६ पाकळ्या
• हळद – १ टीस्पून

Palak Paneer Recipe In Marathi

कृती

▪️टोमॅटो चटणी कशी बनवायची? | How To Make Tomato Chatani?

१) सर्वप्रथम कांदा,टोमॅटो कट करून घ्यावे.
२) गॅस वरती गरम करायला ठेवा त्यामध्ये तेल टाका आणि कांदा टाका.
३) कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
४) कांदा लाल झाला की त्यामध्ये कढीपत्ता मोहरी जिरे टोमॅटो मीठ टाका आणि चांगलं परतून घ्या त्यानंतर ५ मिनिट झाकण ठेवा.
५) ५ मिनिट झाल्यानंतर त्यामध्ये धने पावडर गरम मसाला प्रवीण मसाला मिरची पावडर लसूण हळद टाका आणि परतून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाका.
६) शेंगदाण्याचा कूट टाकून झाला की त्यामध्ये थोडेसे तेल टाकावे ५-१० मिनिट झाकून ठेवून द्या.
७) आता प्लेट प्लेट काढा आणि आपल्या सर्विंग डिशमध्ये टोमॅटोची चटणी काढून बाजरीच्या भाकरी सोबत सर्व्ह करा. किंवा चपाती सोबत ही सर्व्ह करू शकतात.

Shahi Paneer Recipe In Marathi

Shevga Shenga Recipe In Marathi

Exit mobile version