Site icon Aapli Recipe

Upma Recipe In Marathi

Upma Recipe In Marathi उपमा रेसिपी संपुर्ण माहिती मराठीमध्ये:

▪️उपमा रेसिपीविषयी थोडक्यात | About Upma Recipe:

रवा उपमा ही पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. हे दक्षिण भारतात भरपूर बनवले जाते. उपमा हे एक हलके अन्न आहे, ते सकाळी सकाळी रोजच्या नाष्त्यामध्ये घेतले जाते.जे लोक डाएट करतात त्यासाठी उपमा हे एक बेस्ट ऑप्शन्स आहे. उपमा आपण चटणी, सांभर सोबत घेऊ शकतो. उपमा बनवायला सोपी देखील आहे आणि जास्त वेळ पण जास्त लागत नाही. भूक लागली की लगेच आपण बनू शकतो.चला तर बघुया घरबसल्या उपमा कसा बनवायचा.

उपमा रेसिपी मराठी | Upma Recipe in Marathi

▪️उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Ingredients For Umpa:• १ कप बारिक रवा

• तूप/तेल

• शेंगदाणे

• मोहरी

• जिरे

• हिंग

• बारीक चिरलेला कांदा

• १-२ हिरव्या मिरच्या

• कढीपत्ता

• पाणी

▪️उपमा बनवण्याची प्रक्रिया | How To Make Upma:


१) कढई गरम करून तूप/तेल घाला आणि त्या मध्ये रवा चांगला मिसळा रवा सुमारे ६-७ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या.(जो पर्यंत तो थोडा सा लालसर दिसत नाही तोपर्यंत)

२) कढई नॉर्मल आचेवर गरम करा आणि तेल टाका.

३) त्या मध्ये मोहरी,जिरे,हिंग,कांदा घाला चांगले मिक्स करावे आणि हिरवी मिरची, कढीपत्ता पाने घालावे.

४) चांगले मिसळून घ्या आणि ५-६ मिनिटे शिजवा कांदा मऊ परत होईपर्यंत शिजवावा.

५) त्यानंतर भाजलेला रवा घालून मिक्स करावे, व त्यात हळूहळू गरम नॉर्मल पाणी, मीठ आणि साखर घालावी.

६) ते चांगले व्यवस्थित मिक्स करा आणि नॉर्मल गॅस कमी करा.

७) आपण आपल्या चवनुसार पाण्याचे प्रमाण बदलू शकतो (जस लागेल टस)

८) मध्यम आचेवर १/३ मिनिटे झाकून ठेवा आणि शिजवा.

९) अशा प्रकारे आपला उपमा/उपीट तयार झाले आहे.

१०) सर्व्ह करताना बारीक चिरलेली कोथिंबीर, ताजे किसलेले खोबरे आणि धणे घालावेत.खोबरे आवडत नसेल तर नाही घातले तरी चालेल.

Upma Recipe In Marathi

▪️सूचना:तुमच्या चवीनुसार आणि उपलब्धतेनुसार उपमामध्ये फुलकोबी किंवा इतर कोणतीही भाजी घालता येते.

Exit mobile version